मी जसा असतो, तसा दिसतो... असं म्हणणाऱ्या रमेश देव यांची `ती` इच्छा अपूर्णच
हृदयविकाराच्या झटक्याने ९३ व्या वर्षी सिने अभिनेते रमेश देव यांचं निधन
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं बुधवारी निधन झालं. ९३ व्या वर्षी रमेश देव यांनी अखेरचा श्वास घेतला. रमेश देव यांच्यावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. रमेश देव यांची एक इच्छा मात्र अपूर्णच राहिली. त्याबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.
रमेश देव यांनी ३० जानेवारीला आपला ९३ वा वाढदिवस साजरा केला. रमेश देव यांना आपली शंभरी अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरी करायची होती.
एका कार्यक्रमात त्यांनी तशी इच्छा व्यक्त केली होती. तीन दिवसांपूर्वीच त्यांनी आपला वाढदिवस कुटुंबियांसोबत साजरा केला होता. (रमेश देव यांचा शेवटचा डान्स व्हिडीओ, नव्वदीतही लाजवेल असा परफॉर्मन्स)
त्यांनतर रमेश देव यांना हृदयविकाराचा झटका आला. कोकिलाबेन रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रमेश देव यांच्या उत्साहाने कायमच तरूणांना लाजवलं आहे. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रमेश देव यांच्या जाण्यावर अनेक कलाकारांनी दुःख व्यक्त केलं आहे. त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पसंतीला पडत आहे.
फुलं आणि सुंदर मुली हा रमेश देव यांचा विक पॉईंट आहे असं देखील त्यांनी एका मुलाखतीत मांडल आहे. रमेश देव आणि सीमा देव यांची लव्हस्टोरी खूप चर्चेत आहे.
हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांची प्राणज्योत मालवली. रमेश देव यांच्या जाण्यानं सिने क्षेत्रात शोककळा पसरलीय. आज दुपारी अडीच वाजता विलेपार्लेच्या पारसी वाडा त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
रमेश देव यांनी हिंदीसह अनेक मराठी चित्रपटांत काम केलं आहे. 285 हिंदी सिनेमा, 190 मराठी सिनेमा, 30 नाटक आणि जाहिरांतीमध्ये रमेश देव यांनी काम केलं आहे.